ठाण्याच्या महापौरांवर कारवाईची टांगती तलवार

July 24, 2012 7:34 AM0 commentsViews: 5

24 जुलै

ठाण्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील सध्या चांगलेच वादात अडकले आहे. महापौरांनी अधिकार्‍यांना धमकावल्याबाबत त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी आणि गैरवर्तन केल्यामुळे महापौरांना सहा वर्षांसाठी अपात्र ठरवलं जावं अशी मागणी महापालिका आयुक्त आर.ए.राजीव यांनी केली आहे. याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाठवला आहे. आपल्या प्रभागातील व्यायमशाळेच्या साहित्य खरेदीच्या फायलीवर आपल्या म्हणण्याप्रमाणे शेरा न दिल्यानं चीफ ऑडिटर सत्यवान उबाळे यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याबाबतची तक्रार उबाळे यांनी आयुक्त आर.ए.राजीव यांच्याकडे केली होती.

close