राजेश खन्नांच्या संपत्तीचा वाटा मिळावा, महिलेची मागणी

July 21, 2012 5:09 PM0 commentsViews: 2

21 जुलै

बॉलिवूडचेपहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांना शुक्रवारी अखेरचा निरोप देण्यात आला. पण त्यांच्या मृत्यूच्या एक दिवस आधीच त्यांच्या मालमत्तेचा वाद निर्माण झालाय. मंगळवारी अनिता अडवाणी नावाच्या महिलेनं राजेश खन्ना यांच्या संपत्तीचा वाटा मिळावा, यासाठी कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

आपण राजेश खन्ना यांच्या लिव्ह-इन पार्टनर होतो, असा दावा त्यांनी केलाय केलाय. आपल्याला राहण्यासाठी घर आणि महिन्याला ठराविक रक्कम मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. गेल्या जूनपासून आपल्याला राजेश खन्ना यांच्या आशीर्वाद बंगल्यात येण्यापासून अटकाव करण्यात येत असल्याचं तिचं म्हणणं आहे. पण राजेश खन्ना यांचे बिझनेस मॅनेजर अश्‍विन ठक्कर यांनी अनिता अडवाणी यांचा दावा फेटाळून लावलाय. राजेश खन्ना यांना भेटायला अनेक लोक येत, त्यापैकीच अनिता एक असल्याचं त्यांनी म्हटलंय. सूत्रांच्या माहितीनुसार राजेश खन्ना यांच्या आशीर्वाद बंगल्यात अनिताला अनेकांना वारंवार पाहिलंय. राजेश खन्ना हॉस्पिटलमध्ये असताना अनिता तिथं वारंवार यायच्या, अशी माहितीही सूत्रांनी दिलीय. राजेश खन्ना यांच्या अंत्ययात्रेत त्यांच्या पार्थिवाजवळ जाण्याचा अनिता यांनी प्रयत्न केला. पण त्यांना रोखण्यात आल्याचं समजतंय.

close