‘येरे येरे पावसा तुला देतो, 17 कोटी रुपये’

July 21, 2012 5:25 PM0 commentsViews: 104

21 जुलै

'येरे येरे पावसा तुला देतो पैसा…' हे बालगीत आता सत्यात उतरणार आहे कारण पावसाला खूश करण्यासाठी कर्नाटक सरकारने 17 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. कर्नाटकात पावसानं दडी मारल्यानं गेल्या 42 वर्षांतला सर्वात भीषण दुष्काळ पडला आहे. बळीराजा हवालदिल झालाय. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे. यावर उपाययोजना म्हणून कर्नाटक सरकार वरुण देवतेला साकडं घालणार आहे. आणि त्यासाठी राज्यातल्या सर्व मंदिरात खास पूजा करण्याचे आदेश सरकारने दिले आहे. त्यासाठी सरकारने तब्बल 17 कोटी रुपयेसुद्धा मंजूर केलेत. प्रत्येक मंदिरात पाच हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. पण सरकारच्या या निर्णयाबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे. आमदारांनी स्वतःच्या खिशातून पूजेसाठी पैसे द्यावेत, लोकांवर भार कशाला, असा प्रश्न लोकांनी विचारला आहे.

close