पेट्रोलियम मंत्री मुरली देवरांना नोटीस

November 25, 2008 11:29 PM0 commentsViews: 2

26 नोव्हेंबर दिल्लीभाजपनं तक्रार केल्यानंतर अखेरीस निवडणूक आयोगानं पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांना नोटीस बजावली. पेट्रोलियम पदार्थांच्या किमती कमी करण्याचे संकेत काल देवरा यांनी दिले होते. यामुळे निवडणूक आचार संहितेचा भंग झालाय, असा भाजपचा आरोप आहे. दरम्यान, दर कपातीसाठी विराधीपक्षाकडूनच दबाव आल्याचं स्पष्टीकरण मुरली देवरा यांनी दिलं आहे. पेट्रोलच्या किमती महिन्याभरात कमी करू, असे संकेत देणा-या देवरा यांना निवडणूक आयोगानं नोटीस बजावली आहे. दर कमी होण्याचे संकेत देवरा यांनी मंगळवारी दिले होते. सध्या सहा राज्यातल्या विधानसभा निवडणुकींची आचारसंहिता लागू आहे. तिचा देवरांनी भंग केल्याची तक्रार भाजपच्या शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाकडे केली होती.

close