चंद्रपूरमध्ये पट्टेदार वाघीणीचा संशयास्पद मृत्यू

July 24, 2012 11:07 AM0 commentsViews:

24 जुलै

चंद्रपूरमध्ये एका पट्टेदार वाघीणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातही घटना घडली आहे. आज सकाळी अड्याळ टेकडीच्या रस्त्यावर वाघिणीचा मृतदेह आढळून आला. वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे. मात्र वाघीणीचा मृत्यू कशामुळे झाला आहे याबद्दल कोणताच खुलासा करण्यात आला आहे. वाघीणीचा मृत्यू नैसर्गीकरीत्या झाला की शिकार याचा तपास अधिकारी करत आहे.

close