प्रणवदांचा विजय निश्चित

July 22, 2012 8:28 AM0 commentsViews: 2

22 जुलै

देशाच्या राष्ट्रपतीपदी प्रणव मुखर्जी यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार प्रणवदा आघाडीवर आहे.राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकी पहिल्या टप्प्यातील मतदानात प्रणवदांनी मोठी आघाडी घेतली आहे. यामध्ये 748 खासदारांचे मतं मोजणी पूर्ण झाली असून 15 मत रद्द केली आहे. यात 206 खासदारांचे मतं संगमांना मिळाली असून प्रणवदांना 527 मतं मिळाली आहे. प्रणवदांना आतापर्यंतच्या मोजणीतून 4,38,552 मत मिळाली आहे. तर संगमांना 1,63,386 मतं मिळाली आहे यावरुन प्रणवदांचा विजय निश्चित मानला जात आहे. आता फक्त प्रणवदांना 50 हजार 870 मतं हवी आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण मतं 10 लाख 98 हजार 882 आहेत. विजयासाठी 5 लाख 49 हजार 422 मतांची गरज आहे. दुसर्‍या टप्प्यात हरियाणामधून प्रणवदांना 53 मतं मिळाली तर संगमांना 29 मत , गुजरातमध्ये प्रणवदांना 59 मतं तर संगमांना 123 मतं, गोव्यात प्रणवदांना 9 आणि संगमांना 21 मतं, छत्तीसगढमध्ये प्रणवदांना 39 तर संगमांना 50 मतं मिळाली. तिकडे बिहारमध्ये प्रणवदांना 146 मत तर संगमांना 90 मत मिळाली. आणि आसाममध्ये संगमांना फक्त 13 मत मिळाली तिथे प्रणवदांना 110 मत मिळाली आहे.

close