भारताचा पाकिस्तान क्रिकेट दौरा अडचणीत

November 25, 2008 11:37 PM0 commentsViews: 2

26 नोव्हेंबर भारताचा पाकिस्तान क्रिकेट दौरा पुन्हा अडचणीत आला आहे.यावेळी भारताच्या 6 सीनिअर क्रिकेटपटूंनीच पाकिस्तानच्या क्रिकेट दौ-याबाबत नाराजी व्यक्त केली. बीसीसीआयमधल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारताचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणी , सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विरेंद्र सेहवाग आणि हरभजन सिंग पाक दौ-यावर जाण्यास तयार नाहीत. पाकिस्ताननं कितीही सुरक्षा पुरवली तरी खेळाडूंचा मात्र त्यावर विश्वास नसल्याचं सुत्रांच म्हणणं आहे. भारताचा पाकिस्तान दौरा नियोजित वेळेतच व्हावा यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एझाज बट्ट भारतात येणार आहेत. पण त्यापूर्वीचं भारतीय खेळाडंूनी नाराजी व्यक्त केल्यामुळे या दौ-यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

close