ठाण्यात शिवसेनेला धक्का, स्थायी समिती बरखास्त

July 24, 2012 2:05 PM0 commentsViews: 2

24 जुलै

अधिकार्‍याला धमकी दिल्याप्रकरणी अडचणीत आलेले शिवसेनेचे महापौर हरीश्चंद्र पाटील यांना आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. महापौरांनी स्थापन केलेली स्थायी समिती बरखास्त करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहे. तसेच नव्यानं प्रक्रिया राबवून स्थायी समितीची निवडणूक पुन्हा घेण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. शिवसेनेनं काँग्रेसच्या मनोज शिंदे यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद देत राष्ट्रवादीला शह देण्याचा प्रयत्न केला होता. पण काँग्रेस हा राष्ट्रवादीसोबत आघाडीत असल्याने काँग्रेसला हे अध्यक्षपद स्वीकारता येणार नाही असा दावा करत राष्ट्रवादीने हायकोर्टात याचिका सादर केली होती. तसेच आघाडीमधून बाहेर पडण्याची काँग्रेसची विनंतीही कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक आता रंगतदार होणार आहे.

close