आसाममध्ये हिंसाचारात मृतांची संख्या 21 वर

July 24, 2012 4:24 PM0 commentsViews: 2

24 जुलै

आसाममधल्या खोकराझारमध्ये सुरु झालेला हिंसाचार आसपासच्या जिल्ह्यातही पसरतोय. खोकराझारमध्ये शुक्रवारी रात्री बोडो आणि अल्पसंख्याक समाजामध्ये झालेल्या दंगलीतल्या मृतांची संख्या आता 21 वर गेली आहे. दंगलखोरांनी जवळपास 400 गावं पेटवून दिली आहेत. तर या दंगलीमुळे जवळपास 50 हजार लोकांनी सरकारी सुरक्षा छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. दंगलग्रस्त भागात कर्फ्यू लावण्यात आलाय. CRPF च्या 14 अतिरिक्त तुकड्या मागवण्यात आल्या आहे. हिंसाचारामुळे ट्रेन वाहतूकही पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.

close