बाळासाहेब ठाकरे लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल

July 24, 2012 1:46 PM0 commentsViews: 82

24 जुलै

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना लिलावती हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलंय. श्वसनाच्या त्रासामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. गेल्या दोन तीन दिवसांपासून बाळासाहेबांना अस्वस्थ वाटतं होतं. आज सकाळी त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलंय. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बाळासाहेब चार ते पाच दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल असणार आहे. मात्र शिवसेनेकडून रुटीन चेकअप करण्यासाठी बाळासाहेबांना दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. काल सोमवारीच उध्दव ठाकरे यांच्यावर ऍजिओप्लाटीनंतर डिस्चार्ज देण्यात आली आहे.

close