रजत पदक विजेती ऍथलिट करतेय वीटभट्टीत काम

July 24, 2012 4:30 PM0 commentsViews: 6

24 जुलै

2006च्या दोहा एशियाड स्पर्धेत भारतासाठी रजत पदक पटकवणार्‍या ऍथलिटला सरकारी धोरणामुळे मजुरीचं काम करण्याची वेळ आली आहे. शांती सौदराजन असं तिचं नाव आहे. तामिळनाडुतल्या काता-कुरुची गावातली शांती हिनं अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे. पण सध्या ती एका वीटभट्टीत काम करते. लिंगनिदान चाचणीत ती फेल झाल्याने तिची सर्व पारितोषिकं काढून घेण्यात आलीत. ऍथलेटिक्सच्या रेकॉर्ड्समधूनही तिचं नाव वगळण्यात आलंय. तिला नोकरीही नाकारलीय. याविरोधात तिनं प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. पण तिच्या तक्रारीची दखल कुणीही घेतली नाही.

close