भुजबळांनी बोगस कंपन्यांना विकले शेअर्स – सोमय्या

July 24, 2012 7:39 AM0 commentsViews: 5

24 जुलै

सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज भुजबळ, पुतण्या समीर भुजबळ आणि भुजबळांचे जावई जितेंद्र वाघ संचालक असलेल्या परवेश कंस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कपंनीने चढ्या दराने ज्या कंपन्यांना शेअर्स विकल्याच दाखवल आहे. त्या सर्व कंपन्या बोगस असल्याचा आरोप भाजप नेत किरीट सोमय्या यांनी केला आहे. परवेश कंपनीने 31 विविध कंपन्यांना शेअर्स विकले यातून परवेश कंपनीने 100 कोटी रुपयांचा फायदा झाला असा सोमय्या यांनी आरोप केला केला आहे. नवी मुंबईतील नेरुळ येथील दोन कंपन्यांना परवेश कंपनीने शेअर्स विक्री केली होती. या पैकी दोन कंपन्या नेरुळ येथे आहेत या दोन कंपन्यांनी 58 कोटी 80 लाख रुपयांचे शेअर्स परवेश कंपनीकडून घेतल्याच बॅलन्स शीट मध्ये दाखवण्यात आल होतं. पण या दोन्ही कंपन्यांच्या पत्त्यावर निवासी घरे असल्याच आढळून आल आहे. या विरोधात किरीट सोमय्या दिल्लीतील विविध यंत्रणांकडे तक्रार दाखल करणार आहेत.

close