बाळासाहेबांची प्रकृती स्थिर;राज यांनी घेतली भेट

July 25, 2012 9:46 AM0 commentsViews: 34

25 जुलै

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती स्थिर आहे. श्वसनाच्या त्रासामुळे काल मंगळवारी त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. बाळासाहेब अजून 4 ते 5 दिवस लीलावती हॉस्पिटलमधे राहण्याची शक्यता आहे. आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाळासाहेबांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपुस केली. श्वसनाचा त्रास आणि अपचनांच्या तक्रारींसाठी काही टेस्टही केल्या जाणार आहेत. गेल्या मे महिन्यात बाळासाहेबांना श्वसनाचा त्रास झाला होता. लीलावतीमध्ये तपासणी केल्यानंतर बाळासाहेब ठणठणीत बरे झाले होते. उध्दव ठाकरे यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे शुक्रवारी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली यानंतर त्यांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला होता. उध्दव लीलावतीमध्ये दाखल होते तेव्हा राज यांनी राजकारण बाजूला ठेवून त्यांची भेट घेतली. आजारपणानिमित्ताने राज-उध्दव यांची साडेतीन वर्षानंतर भेट झाली. काल बाळासाहेबांना लिलावतीमध्ये दाखल करण्यात आलं. सुरुवातीला रुटीन चेकअपसाठी दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं पण डॉक्टरांच्या निर्णयानंतर बाळासाहेबांना दाखल करुन घेण्यात आलं.

close