ताज हॉटेलमध्ये गोळीबार चालूच

November 26, 2008 10:24 PM0 commentsViews: 1

27 नोव्हेंबर मुंबईभारताची शान समजल्या जाणा-या मुंबईतल्या ताजमहाल हॉटेलमध्ये दहशतवाद्याशी चकमक चालू आहे. दहशतवाद्यांनी ताज हॉटेलमधील लोकांना बंधक केलं आहे. दरम्यान ताज हॉटेलमध्ये 6 स्फोट झाले. ताज मधल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. ताज हॉटेलमधल्या 50 जणांना बाहेर काढण्यात पोलिसांना यश आलं असून जखमींना कामा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे. मात्र अद्यापही तीन ते चार अतिरेक्यांनी ताजमधील पर्यटकांना ओलीस ठेवल्याची माहिती मिळाली आहे. यात 5 परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. दरम्यान दहशतवाद्यांचा गोळीबार चालू आहे. या गोळीबारात 60 जण ठार झाले आहेत ओबेरॉय हॉटेलला लष्कराने वेढा टाकला आहे.मुंबईवर हल्ला करणारे दहशतवादी समुद्रमार्गाने मुंबईत आल्याच सांगण्यात येतं. मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

close