जे.डे हत्याप्रकरणात जिग्ना व्होराला विनाकारण गोवले – तावडे

July 25, 2012 10:11 AM0 commentsViews: 4

25 जुलै

मिड डे चे पत्रकार जे.डे हत्याप्रकरणात पत्रकार जिग्ना व्होराला विनाकारण गोवण्यात आल्याचा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केला आहे. जे. डे हे आयपीएलमधील मॅचफिक्सिंगविषयी एक मोठं प्रकरण उघड करणार होते. त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप विनोद तावडे यांनी केलाय. कायदा आणि सुव्यवस्थेवरील चर्चेदरम्यान त्यांनी हा आरोप केलाय. डे यांच्या हत्येनंतर पत्रकारांनी दोषींना शिक्षा व्हावी या मागणीसाठी सुरू केलेलं आंदोलन दडपण्यासाठी सरकारनं जिग्ना व्होरा या पत्रकाराला हत्येच्या आरोपाखाली अडकवल्याचा आरोपही तावडेंनी केला.

close