भारताचा लाजीरवाणा पराभव

July 24, 2012 8:47 AM0 commentsViews: 3

24 जुलै

भारत आणि श्रीलंकादरम्यानची दुसरी वन डे आज श्रीलंकेतल्या राजपक्षे आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर खेळवली गेली. श्रीलंकेविरुध्दच्या दुसर्‍या वन डेत भारताला लाजीरवाण्या परभवाला सामोरं जावं लागलंय. श्रीलंकेनं भारताचा 9 विकेट आणि 30 ओव्हर राखून धुव्वा उडवला. पहिली बॅटिंग करणार्‍या भारताची इनिंग अवघ्या 138 रन्सवर गडगडली. गौतम गंभीर वगळता भारताच्या एकाही बॅट्समनला मोठा स्कोर करता आला नाही. गंभीरनं 65 रन्स केले. याला उत्तर देताना थरंगा आणि दिलशाननं हाफसेंच्युरी करत लंकेला शानदार विजय मिळवून दिला.

close