परभणीत बलात्कारनंतर जाळून घेतलेल्या मुलीचा मृत्यू

July 25, 2012 10:29 AM0 commentsViews: 9

25 जुलै

एकीकडे मुलींच्या छेडछाडीच्या घटना ताज्या असताना परभणीत बलात्कार झाल्यानं एका अल्पवयीन मुलीनं जाळून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.जिल्ह्यातील जाम या गावात ही घटना घडली. ही मुलगी एका शेतात काम करण्यासाठी गेली असताना शेतमालकाने तिच्यावर बलात्कार केल्याचं या मुलीनं मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबात म्हटलंय. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर ही मुलगी घरी आली आणि तिनं स्वत:ला जाळून घेतलं. यात ही मुलगी 90 टक्के भाजली होती. उपचारादरम्यान, या मुलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी शेतमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

close