टीम अण्णांच्या आंदोलनात गोंधळ

July 25, 2012 11:59 AM0 commentsViews: 4

25 जुलै

आजपासून टीम अण्णाचं दिल्लीतल्या जंतर मंतरवर आंदोलन सुरू झालं आहे. पण आंदोलन सुरू होताच काही जणांनी टीम अण्णांच्या विरोधात जंतरमंतरवर घोषणाबाजी केली. घोषणाबाजी करणारे हे काँग्रेसची विद्यार्थी संघटना NSUI चे कार्यकर्ते असल्याचा आरोप टीम अण्णांनी केलाय. पण काँग्रेसने हा आरोप फेटाळला आहे. टीम अण्णाने केंद्र सरकारच्या पंतप्रधानांसहीत 15 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आणि गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. त्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी आजपासून टीम अण्णांनी उपोषण सुरू केलंय. अण्णासुद्धा या आंदोलनता सहभागी झाले आहे. सरकारने चार दिवसात निर्णय घेतला नाही तर अण्णा 29 जुलैपासून बेमुदत उपोषण सुरू करणार आहेत.

close