बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा; 3 दिवसांनंतर डिस्चार्ज

July 26, 2012 10:28 AM0 commentsViews: 100

26 जुलै

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीत झपाट्यानं सुधारणा होतेय. श्वसनाच्या त्रासामुळे दोन दिवसांपासून बाळासाहेब ठाकरे लीलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमीट आहेत. ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत, तसेच आज बाळासाहेबांनी पेपरही वाचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण अजून दोन ते तीन दिवस बाळासाहेब ठाकरेंना हॉस्पिटलमध्येच रहावं लागणार आहे. दरम्यान, भाजप अध्यक्ष नितीन गडकरींनीही बाळासाहेबांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, दिग्दर्शक मधुर भांडारकर यावेळी उपस्थित होते. यावेळी मधुर भांडारकर यांनी त्यांच्या नव्या सिनेमाबद्दल बाळासाहेबांना माहितीही दिली. काँग्रेस आमदार भाई जगताप यांनीही आज बाळासाहेबांची भेट घेतली.

close