टोल नाक्यावरील कर्मचार्‍यांची चौकशी करणार – गृहमंत्री

July 25, 2012 10:51 AM0 commentsViews: 2

25 जुलै

टोल नाक्यावरील कर्मचार्‍यांचा पार्श्वभुमीची पोलिसांकडून चौकशी केली जाणार असल्याची घोषणा गृहमंत्री आर आर पाटील यांनी केली आहे. टोल नाक्यावरच्या कर्मचार्‍याच्या व्यतिरीक्त अन्य कुणीही टोल वसुली करताना आढळल्यास खंडणीचे गुन्हा लावले जाणार असल्याची गृहमंत्र्यांनी सांगितलं. संजय काका पाटील यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सुचना मांडली होती. काही दिवसापुर्वी खेड शिवापूर टोल नाक्यावर संजय काका पाटील यांना मारहाण झाली होती. या प्रकरणाची चौकशी पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकार्‍याकडून केली जाणार असल्याची घोषणाही गृहमंत्र्यांनी विधान परिषदेत केली.

close