बिग बी ऑलिम्पिक रिलीमध्ये सहभागी

July 26, 2012 10:37 AM0 commentsViews: 6

26 जुलै

बॉलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन यांचा ऑलिम्पिकमध्ये गौरव करण्यात आला आहे. लंडन ऑलिम्पिकची तयारी पूर्ण झाली आहे. लंडन ऑलिम्पिकला आता केवळ एका दिवसाचा अवधी उरला आहे आणि ऑलिम्पिक टॉर्च रिलेचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज लंडन शहरात ऑलिम्पिक टॉर्च फिरवण्यात आली. यावेळी ऑलिम्पिक टॉर्च घेऊन धावन्याचा मान अमिताभ बच्चन यांना मिळाला. 100 ते 150 मीटरपर्यंत अमिताभ बच्चन यांनी ऑलिम्पिक टॉर्च वाहिला. लंडन ऑलिम्पिक संघटनेनं अमिताभ बच्चन यांना टॉर्च रिले कार्यक्रमात सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं होतं. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल बिग बीचा सन्मान करण्यात आला.

close