दंगलीमध्ये दोषी आढळलो तर फासावर लटकवा – मोदी

July 26, 2012 12:14 PM0 commentsViews: 1

26 जुलै

गुजरात दंगलीमध्ये दोषी आढळलो तर फासावर जायला तयार आहे, असं गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 2002 च्या गुजरात दंगलीनंतर मोदी यांनी पहिल्यांदाच 'नयी दुनिया' या उर्दू वर्तमानपत्राला मुलाखत दिली यावेळी ते बोलत होते. पण जर आपण दोषी आढळलो नाही तर माध्यमं आणि विरोधकांनी आपली माफी मागायला हवी, असंही ते म्हणाले. गुजरातमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा मुस्लिमांना आपलंसं करण्याचा प्रयत्न आहे का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

close