आदर्श प्रकरणी खोटी माहिती दिल्याचं कुपेकरांनी केलं मान्य

July 25, 2012 12:06 PM0 commentsViews: 22

25 जुलै

आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी बाबासाहेब कुपेकर यांची आयोगासमोर साक्ष सुरु झाली आहे. कुपेकर यांचा आदर्शमध्ये 1301 क्रमांकाचा फ्लॅट आहे. कुपेकर यांना सोसायटीने जमिनीसाठी अर्ज करण्याआधीच सदस्यत्व मिळाले होते. तर कुपेकर यांनी आपले मासिक उत्पन्न 15 हजार दाखवले होते. मासिक उत्पन्नाबाबत खोटी माहिती दिल्याचं कुपेकर यांनी मान्य केलं आहे. दरम्यान, याचप्रकरणी अशोक चव्हाण यांचे चुलत सासरे मदनलाल शर्मा यांची साक्ष झाली आहे. वाळकेश्वरमध्ये फ्लॅट असतानाही त्यांनी अर्ज केला होता आणि त्यांना आदर्शमध्ये फ्लॅट मिळालाही होता.

close