मराठी-कानडी वादामुळेच तरुण भारतची गळचेपी -किरण ठाकूर

July 26, 2012 12:26 PM0 commentsViews: 19

26 जुलै

दैनिक 'तरुण भारत'च्या संपादकांवर हक्कभंगाची कारवाई करण्याचा निर्णय कर्नाटक विधानसभेने घेतला आहे. मराठी कानडी वादामुळेच तरुण भारतची गळचेपी केली जात असल्याचा आरोप तरुण भारतचे संपादक किरण ठाकू र यांनी केलाय. पुण्यामध्ये काल बुधवारी याविषयी माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी उपस्थित होते.

तरुण भारतमध्ये दक्षिण बेळगावचे आमदार अभय पाटील आणि रायबाग कुडचीचे आमदार शाम घाटगे यांनी केलेल्या गैरव्यवहाराविषयीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याबद्दल या दोन आमदारांनी कर्नाटक विधानसभेच्या सभापतींकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर कर्नाटक विधानसभेनं ठाकूर यांच्यावर ठपका ठेवुन त्यांनी विधानसभेसमोर या आमदारांची माफी मागावी असा निर्णय दिला. त्याबरोबरच वृत्तपत्राची मान्यता रद्द करावी अशी शिफारसही केली. हा निर्णय एकतर्फी असून मराठी कानडी वादामुळेच त्यांनी हा गळचेपी करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणाची माहिती भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांना दिली आहे. त्यांनी या प्रकरणाची दखल घेण्याचं आश्वासनही दिलंय. मात्र अजूनही काहीही झालं नसल्याचं ठाकूर म्हणाले.

close