टोल न भरणं खपवून घेणार नाही – मुख्यमंत्री

July 26, 2012 1:06 PM0 commentsViews: 9

26 जुलै

टोल वसूल करण्यासाठी ज्या त्या कंत्राटदार किंवा कंपन्यांना कायदेशीर अधिकार आहे. पण कोणी कायदा सुव्यवस्था भंग करत असेल तर ते खपवून घेतले जाणार त्याला जसेच्या तसे उत्तर दिले जाईल असा इशारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मनसेला दिला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल नाक्याविरोधात आंदोलन पुकारले आहे. 15 दिवस टोलनाक्यावर परिक्षण करुन जोपर्यंत सरकार टोल वसुलीत पारदर्शकता आणत नाही तोपर्यंत जनतेनं टोल भरु नये असं जाहीर आवाहन राज यांनी दिलं होतं. राज यांच्या आंदोलनानंतर कार्यकर्त्यांनी आदेश पाळत राज्यातील विविध टोल नाक्यावर वसुली बंद पाडली. जनतेनंही मनसेच्या आंदोलनाचं स्वागत केलं. ज्यासाठी आपण टोल देत आहोत पण त्यातून कोणत्याच सोईसुविधा मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. मात्र मनसे कार्यकर्ते मागे फिरताच टोल नाक्यावर पुन्हा वसुली सुरु झाली. याप्रकरणी काल बुधवारी गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी टोल नाक्यावरील कर्मचार्‍यांच्या पार्श्वभूमीची चौकशी करण्यात येईल जर दोषी आढळले तर थेट खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येईल अशी घोषणा केली. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली.

राज्यात लवकरच काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या समन्वय समितीची बैठक बोलावली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्याचबरोबर मनसेच्या टोल आंदोलनाचा समाचार घेतला. टोल भरणं हे बंधनकारक आहे. यासाठी प्रत्येक कंत्राटदार,कंपन्यांना ठराविक काळामर्यादासाठी टोल वसुलीचा अधिकार दिला आहे. पण कायदा हातात घेऊन टोल बंद पाडणे चुकीचे आहे. कायदा,सुव्यवस्था भंग करणार्‍यांवर थेट कारवाई करण्यात येईल त्यांना तसेच उत्तर दिले जाईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

close