कलमाडींच्या लंडनवारीला ब्रेक

July 25, 2012 5:45 PM0 commentsViews: 1

25 जुलै

लंडन ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याला हजर राहण्याचे सुरेश कलमाडी यांचे प्रयत्न अयशस्वी झाले आहे. दिल्ली हायकोर्टाने कलमाडी यांना परवानगी नाकारली आहे. 27 जुलैपुर्वी कलमाडींना देशाबाहेर जाता येणार नाही, असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. त्यानंतर कलमाडी वैयक्तिकरित्या ऑलिम्पिक गेम्सना हजर राहू शकतात, असं कोर्टाने स्पष्ट केलंय.

कॉमनवेल्थ घोटाळ्यातील मुख्यआरोपी सुरेश कलमाडी हे ऍथलिटचे प्रतिनिधी असल्यामुळे त्यांना आमंत्रण आले. मात्र कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणाची चौकशी सुरु असल्यामुळे कलमाडींना देश सोडता येत नाही. कलमाडींनी पतियाळा कोर्टात याबद्दल अर्ज दाखल केला होता. पतियाळा कोर्टाने परवानगीही दिली होती. मात्र क्रीडामंत्र्यांनी कलमाडींच्या जाण्यावर आक्षेप घेतला. तुरुंगाची हवा खाऊन आलेल्या कलमाडींना भारताच्या शिष्टमंडळसोबत जाता येऊ शकत नाही असं ठणकावून सांगितले. याप्रकरणी कलमाडींना भारतीय ऑलिम्पिक मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. पण कलमाडींनी पलटी मारत क्रीडामंत्र्यांच्या राजीनाम्याची पंतप्रधानांकडे मागणी केली होती. आज दिल्ली कोर्टाने कलमाडींच्या लंडनवारीला रेड सिग्नल दिला पण यामुळे ते फार फार उद्घाटन सोहळ्याला मुकतील पण बाकींच्या खेळांना व्यक्तीगत खर्चाने जाऊ शकतात.

close