वांग मराठवाडी धरण आंदोलनाला पावसाचा तडाखा, सरकार गप्पच

July 26, 2012 2:14 PM0 commentsViews: 12

26 जुलै

सातारा जिल्ह्यातल्या वांग मराठवाडी धरणग्रस्तांचं आंदोलन पेटलं आहे. धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे पाणी पातळी वाढल्याने गोटील गावाचा संपर्क तुटला आहे. आंदोलनकर्त्या शोभा पाटील पाण्यात बुडाल्या, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. गेल्या अनेक दिवसांपासून धरणग्रस्तांचं सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. धरणग्रस्तांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याच्या निषेधासाठी शेतकर्‍यांनी धरणावरच आंदोलन सुरु केलंय. धरणग्रस्तांपैकी एक हजार धरणग्रस्तांचं पुनर्वसन झालंय. उरलेल्या धरणग्रस्तांना लाभक्षेत्रामध्ये जमीन मिळत नाहीय, त्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. पोलिसांनी बघ्याची भूमिका घेत आहे असा आरोप आंदोलक करत आहे.

close