बनावट नोटा चलनात आणणार्‍या दोघांना अटक

July 25, 2012 4:20 PM0 commentsViews: 1

25 जुलै

बनावट नोटा चलनात आणणार्‍या पश्चिम बंगालच्या दोन तरूणांना पुणे पोलिसांनी पुणे कॅम्प परिसरातून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तरूणांकडून पोलिसांनी एक लाख 49 हजार पाचशे रूपये जप्त केले आहे. अल्ताफ अली दाराबली शेख आणि जुल्फीकार शेख अशी अटक करण्यात आलेल्या तरूणाची नावं आहेत. अटक करण्यात आलेल्या तरूणांना कोर्टाने 3 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

close