गुरुवारी शेअरबाजार बंद

November 27, 2008 4:51 AM0 commentsViews: 14

27 नोव्हेंबर, मुंबईमुंबईत झालेल्या हल्ल्यामुळे गुरुवारी बीएससी आणि एनएससी मधलं ट्रेडिंग बंद राहणार आहे. शहरात असलेली तणावाची परिस्थिती आणि लोकांना घरी राहण्याच्या देण्यात आलेल्या सूचना लक्षात घेत ही दोन्ही एक्स्चेंजेस बंद ठेवण्यात येणारेत. यासोबतच मल्टी कमॉडिटी एक्स्चेंज आणि नॅशनल कमॉडिटी एक्स्चेंजही बंद राहतील.देशाच्या इतिहासातला सगळ्यात भयंकर असा अतिरेकी हल्ला बुधवारी मुंबईत झालाय. दहा ठिकाणी अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार आणि ग्रेनेड हल्ला केला असून त्यात 87 जण ठार तर 185 जखमी झाले आहेत.अद्यापही ताज आज आणि ओबेरॉय हॉटेलमध्ये दहशतवादी लपले असून पोलिसांची चकमक चालू आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणावरून हा निर्णय घेण्यात आला.

close