अरविंद केजरीवाल, सिसोदियांची तब्येत ढासळली

July 26, 2012 4:56 PM0 commentsViews: 2

26 जुलै

टीम अण्णांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. पण सरकारकडून अजून टीम अण्णांशी संपर्क साधण्याच्या हालचाली झाल्या नाहीत. दरम्यान, अरविंद केजरीवाल आणि मनिष शिसोदियांची तब्येत ढासाळली आहे. त्यांचे ब्लड शुगर कमी झाले आहे. दुसरीकडे, टीम अण्णा सरकारमध्ये आज जोरदार शाब्दिक चकमकी झाल्या. सरकार टीम अण्णांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत नसल्याचं केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीद यांनी म्हटल्यानंतर अण्णांनी त्यांच्यावर तोफ डागली. खुर्शीद यांचा दावा खोटा असल्याचं मी सिद्ध करून दाखवतो, असं आव्हान अण्णांनी दिलं. तर, टीम अण्णांचा कायद्यावर विश्वास नसल्याचा आरोप खुर्शीद यांनी केला.

close