कारगील विजयाला 12 वर्ष पूर्ण ; शहिदांना आदरांजली

July 25, 2012 5:19 PM0 commentsViews: 8

25 जुलै

आज कारगील विजय दिवस आहे. यानिमित्तानं जम्मू काश्मीरमधल्या द्रासमधल्या शहिदांच्या स्मारकाला आदरांजली वाहण्यात आली. 12 वर्षांपूर्वी म्हणजे 1999 मध्ये भारताने पाकिस्तानी घुसखोरांना कारगीलमधून बाहेर काढलं होतं. आणि कारगीलचं युद्ध जिंकली होती. पण, या विजयासाठी भारताला मोठी किंमत मोजावी लागली होती. तब्बल 527 जवान या युद्धात शहीद झाले होते. यानिमित्ताने द्रासमधल्या शहिदांच्या स्मारकावर आज अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.

close