लवकरच समन्वय समितीची बैठक बोलावणार – मुख्यमंत्री

July 26, 2012 10:07 AM0 commentsViews: 1

26 जुलै

सहा दिवसांनंतर काल बुधवारी दिल्लीत काँग्रेस राष्ट्रवादीत सुरु असलेला दुरावा संपला आणि आजपासून पुन्हा एकदा समन्वयाचे वारे वाहू लागले आहे. राज्यात लवकरच काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या समन्वय समितीची बैठक बोलावली जाईल असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. त्याचबरोबर काही आमदारांच्या प्रश्नावरही चर्चा करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी 2,685 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडे उपलब्ध झाला, असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिलीय. त्याचबरोबर टोल न भरणं हे खपवून घेणार नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मनसेच्या आंदोलनाला थेट इशारा दिला आहे.

close