लंडन ऑलिम्पिकचा आज रंगणार भव्य उद्घाटन सोहळा

July 27, 2012 10:45 AM0 commentsViews: 9

27 जुलै

तिसर्‍या ऑलिम्पिकसाठी लंडन शहर सज्ज झालंय. 17 दिवस चालणार्‍या या ऑलिम्पिक महासोहळ्यासाठी जगभरातील खेळाडू आणि क्रीडाप्रेमी लंडनमध्ये दाखल झाले आहे. लंडनमध्ये ऑलिम्पिक पार्क तयार करण्यात आलंय. विविध मैदानांसह या पार्कमध्ये खेळाडू आणि पदाधिकार्‍यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आलीय. स्ट्रॅटफोर्ड, बो, ल्युटन आणि हॉर्मटन अशा चार भागांमध्ये 250 हेक्टर परिसरात हे ऑलिम्पिक पार्क वसलं आहे. ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा आज रंगणार असून ऑस्कर विजेते दिग्दर्शक डॅनी बोएल यांनी हा सोहळा दिग्दर्शित केला आहे.

लंडनमधील तिसरं ऑलिम्पिक- 17 दिवस चालणार स्पर्धा- 27 जुलै ते 12 ऑगस्ट- एकूण 36 क्रीडा प्रकार- एकूण देश 203- 10500 खेळाडूंचा सहभाग- 15 दशलक्ष अमेरिकन डॉलर खर्च

close