मुंबईत दोन ठिकाणी स्फोटकं सापडली

November 27, 2008 5:53 AM0 commentsViews: 4

27 नोव्हेंबर, मुंबईबवधवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गुरुवारी दोन ठिकाणी स्फोटकं सापडली आहेत. गुरुवारी सकाळी विधानभवनाजवळ एक जिवंत हँड ग्रेनेड निकामी करण्यात आला. तर ताज हॉटेलजवळ आठ किलो आरडीएक्स सापडलं.बुधावरी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांनी ताज आणि ओबेरॉयमध्ये पर्यटकांना ओलीस ठेवलं आहे. ताज आणि ओबेरॉयमध्ये ओलिसांची सुटका करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच ही स्फोटके सापडल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईत अजूनही स्फोटकं मिळण्याच्या शक्येतेने पेलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.

close