निवडणूक लढवणार नाही – अण्णा हजारे

July 28, 2012 9:51 AM0 commentsViews: 3

28 जुलै

स्वत: निवडणूक लढवणार नाही आणि राजकीय पक्षही काढणार नाही पण स्वच्छ प्रतिमेच्या लोकांना पाठिंबा देईन अशी भूमिका अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलीय. अण्णा आणि त्यांच्या टीममधील सदस्य निवडणूक लढवणार आहेत अशा बातम्या आल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर अण्णांनी हे स्पष्टीकरण दिलंय. त्याचबरोबर आपलं आंदोलन गर्दीच्या बळावर नाही तर दर्दी लोकांच्या बळावर असल्याचं अण्णा म्हणाले. टीम अण्णांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. सरकारने अजून टिम अण्णांच्या मागण्यासंदर्भात काहीच भूमिका घेतलेली नाही. टिम अण्णांशी कोणताही संपर्क अजूनपर्यंत सरकारने केलेला नाही. उद्यापासून अण्णा उपोषणाला सुरुवात करणार आहे.

close