टीम अण्णांनी निवडणूक लढवावीच – दिग्विजय सिंग

July 27, 2012 11:31 AM0 commentsViews:

27 जुलै

अण्णा हजारे यांच्या राजकीय पक्ष उघडण्याच्या संकेताबद्दल त्याचे मी स्वागत करतो आता तर अण्णा आणि त्यांच्या टीमचे सदस्य अरविंद केजरीवाल,किरण बेदी,प्रशांत भूषण यांनी निवडणूक लढवावी असं आव्हान दिग्विजय सिंग यांनी दिलं. तर टीम अण्णांचा खरा हेतू आता उघड झाला आहे अशी प्रतिक्रिया नारायण स्वामी यांनी दिली. अण्णा हजारे यांनी आज आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये उपोषणाशिवाय जनतेला दुसरा पर्याय हवाय, त्यामुळे निवडणकांमध्ये चांगल्या उमेदवारांना टीम अण्णा पाठिंबा देईल तसंच त्यांचा प्रचार करेल असं अण्णा हजारे यांनी म्हटलंय. त्यावर काँग्रेसनं आता टीम अण्णांवर टीका केली.

close