वांग मराठवाडी धरणग्रस्त आता काठावर करणार आंदोलन

July 28, 2012 8:03 AM0 commentsViews: 10

28 जुलै

वंाग मराठवाडी धरण आंदोलनात प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर आंदोलनकर्त्यानी एक पाऊल मागे घेतलं आहे. जलाशयात आंदोलन न करता धरणाच्या काठावर आंदोलन करण्याचा निर्णय आता या आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे. या संदर्भात 1 ऑगस्टला बैठक घेण्याच आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आलंय. या पत्रानंतर आंदोलकांनी हा निर्णय घेतला. गेल्या 24 दिवसांपासून धरणग्रस्त आंदोलक पाण्यात उभे राहुन आंदोलन करत होते. दोन दिवसांपूर्वी पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली. परिणामी आंदोलकांच्या गळ्यापर्यंत पाणी आले. एवढं होऊन सुध्दा प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. अखेर दोन दिवसांनंतर जागे झालेल्या प्रशासनाने बैठकीचं आश्वासन दिलं आहे.

close