अनुज बिडवेच्या मारेकर्‍याला जन्मठेपेची शिक्षा

July 27, 2012 12:14 PM0 commentsViews: 2

27 जुलै

पुण्यातला विद्यार्थी अनुज बिडवेच्या मारेकरी कायरन स्टेपल्टन याला आज कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. इंग्लंडमधल्या मँचेस्टर क्राऊन कोर्टाने हा निर्णय दिला आहे. कायरन स्टेपल्टन कमीत कमी 30 वर्षं तुरुंगवास होणार आहे. कोर्टाच्या या निकालावर अनुजच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केलं आहे. आम्हाला न्याय मिळाला आम्ही इंग्लंड पोलीसांचे आभारी आहोत अशी प्रतिक्रिया अनुजच्या वडिलाने दिली. मागिल वर्षी 26 डिसेंबर 2011 रोजी ख्रिसमसला आपल्या मित्रांसोबत अनुज पार्टी करण्यासाठी गेला होता. पार्टीकरून घरी परतत असताना आरोपी कायरन स्टेपल्टन यांने अनुजची गोळ्या झाडून हत्या केली.

close