सुनील तटकरे अँटी करप्शनच्या रडारवर

July 28, 2012 10:09 AM0 commentsViews: 3

28 जुलै

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी राज्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरेंच्या अडचणी आणखी वाढल्या आहे. कुटुंबातच्या मालमत्ता प्रकरण, आणि विविध कंपन्याबाबत तटकरेंच्या मालमत्तेची चौकशी अँटी करप्शन ब्युरोनं सुरु केली आहे. तसेच तटकरे यांच्या चौकशीसाठी ईडी, आयकर विभाग आणि सेबीची मदत घेत असल्याचही, अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकार्‍यांनी किरीट सौमय्या यांना कळवलंय. या सर्व प्रकरणी सोमय्यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत माहिती मागितली होती. याअंतर्गत ही कारवाई करण्यात येत आहे. तटकरे यांनी आपल्या कुटुंबीयांच्या नावाने 140 कंपन्या उघडल्याचं आयबीएन लोकमतने पर्दाफाश केला होता. यात महसूल खात्याचे नियम मोडीत काढून कोट्यावधींचा कर बुडवण्याचा पराक्रमही तटकरेंच्या पुत्रांनी केल्याचं उघड झालं होतं. या प्रकरणी भाजपचे आमदार किरीट सोमय्या यांनी माहितीच्या अंतर्गत आणखी धक्कादायक माहिती बाहेर काढत तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यावर एकच हल्लाबोल केला होता.

close