उध्दव ठाकरेंनी घेतली बाळासाहेबांची भेट

July 28, 2012 10:25 AM0 commentsViews: 87

28 जुलै

शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकर यांनी आज लिलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन शिवेसनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. श्वसनाचा त्रास होत असल्यानं बाळासाहेबांना लिलावतीत दाखल करण्यात आलंय. त्याची तब्येत सुधारत असून दोन-तीन दिवसात त्यांना डिस्चार्ज मिळेल अशी माहिती शिवेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. उध्दव ठाकरे यांच्यावर लिलावतीमध्येच अँजिओप्लास्टी करण्यात आली. सोमवारी डिस्चार्ज मिळाल्यानंतर उध्दव ठाकरेंना डॉक्टरांनी सक्तीचा विश्राम दिला. याच दरम्यान बाळासाहेबांना लिलावतीमध्ये दाखल करण्यात आलं. अखेर सहा दिवसांनंतर उध्दव मातोश्रीच्या बाहेर पडले आणि पहिले लिलावती हॉस्पिटल गाठले. बाळासाहेबांची भेट घेतली.

close