भारताच्या मिशन ऑलिम्पिकला खराब सुरुवात

July 27, 2012 12:48 PM0 commentsViews: 6

27 जुलै

लंडन ऑलम्पिकचा उद्घाटन सोहळा आज रात्री रंगणार आहे. पण त्याअगोदर आज पुरुष आणि महिला तिरंदाजाच्या टीम्सची क्वालिफाईंग स्पर्धा पार पडली. यात पुरुष तिरंदाजी टीमला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. आज क्वालिफाईंगमध्ये भारतीय पुरुष तिरंदाजी टीमला शेवटच्या स्थानावर समाधान मानावं लागलंय. आता शनिवारी क्वार्टर फायनलमध्ये जागा पटकावण्यासाठी त्यांचा मुकाबला होईल तो जपानशी.. आजच्या क्वालिफाईंगमध्ये दक्षिण कोरियाने 2087 पॉईंट्स पटकावत एक नवीन वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे. तर भारतीय टीमला फक्त 1969 पॉईंट्स पटकावता आले आहे.

तर महिला तिरंदाजी टीमची कामगिरी त्या मानाने समाधानकारक राहिली. भारतीय महिला तिरंदाजी टीमनं 12 पैकी 9 वं स्थान पटकावलंय. दिपीका कुमारी, बोम्बायला देवी आणि चेक्रोवोलू स्वुरो यांनी 1938 पॉईंट्स पटकावले. आता रविवारी एलिमिनेशन राऊंडमध्ये भारतीय टीमला आव्हान आहे ते डेन्मार्कचं. जर भारतीय टीमनं डेन्मार्कचा पराभव केला तर त्यांचं क्वार्टरफायनलमध्ये स्थान पक्क होईल. दिपीका कुमारीनं 662 पॉईंट्स पटकावत आज 8 वं स्थान मिळवलं. भारतातर्फे दिपीकाचाच परफॉर्मन्स सगळ्यात उत्तम झाला. तर महिला तिरंदाजीतही दिवस गाजवला तो कोरियानं.

close