लंडन ऑलिम्पिक स्पर्धेची झोकात सुरुवात

July 28, 2012 10:57 AM0 commentsViews: 5

28 जुलै

लंडनमध्ये आयोजित तिसर्‍या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेची झोकात सुरुवात झाली. नजरेचं पारणे फेडणार्‍या या उद्घाटन सोहळ्यात ब्रिटनच्या ऐतिहासिक विकासाचे टप्पे उलगडून दाखण्यात आले. यात ग्रामीण संस्कृती पासून औद्योगिक क्रांतीनंतर ब्रिटनमध्ये आलेले विविध बदल सादर करण्यात आले.'टूर दि फ्रांन्स' चा ब्रिटिश विजेता ब्रेडली विग्गीन्सने घंटानाद केल्यानंतर ऑलिम्पिक खेळाचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलं. या उद्घाटन सोहळ्याचं नावं 'ऑइल्स ऑफ वंडर' असं ठेवण्यात आलं असून स्लमडॉग मिलिनिअर सिनेमाचे दिग्दर्शक डॅनी बोअल यांच्या दिग्दर्शनाखाली हा सोहळा रंगला. साधारण तीन तास हा सोहळा रंगला.

close