तीन वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना वीरमरण

November 27, 2008 7:03 AM0 commentsViews: 183

27 नोव्हेंबर, मुंबई एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांना ताज हॉटेलमध्ये अतिरेक्यांशी लढताना वीरमरण आलं. 22 जानेवारीला हेमंत करकरे यांनी मुंबई एटीएसचे प्रमुखपद स्वीकारलं. यानंतर करकरे चर्चेत आले ते मालेगाव बॉम्बस्फोटाच्या तपासात त्यांनी हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचा दावा केल्यानंतर. 1982 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या हेमंत करकरे यांनी महाराष्ट्र पोलीस सेवेत येण्याअगोदर सात वर्ष रॉमध्ये काम केलं. रॉमध्ये काम करत असताना त्यांची ऑस्ट्रियामध्ये नेमणूक झाली होती. महाराष्ट्रात आल्यानंतर 1991 मध्ये त्यांची चंद्रपूर जिल्ह्यात नक्षलवादी भागात पोस्टिंग झाली. मात्र ही पोस्टिंग शिक्षा न मानता त्यांनी नक्षलग्रस्त भागातही उल्लेखनीय काम केलं. मुंबईत एटीएसच्या प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर मालेगाव बॉम्बस्फोटांच्या तपासात हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचा शोध लावून करकरे पुन्हा प्रकाश झोतात आले. नुकतीच करकरे यांना जीवे मारण्याची धमकीही मिळाली होती.डीसीपी अशोक कामटेही या हल्ल्यात मेट्रो सिनेमाजवळ झालेल्या चकमकीत शहीद झाले. ते राज्य पोलीस दलातले एक प्रमुख अधिकारी होते. सोलापूरचे आयुक्त म्हणून त्यांनी याआधी काम पाहिलं होतं. दक्ष आणि तत्पर अधिकारी म्हणून ते पोलीस दलात ओळखले जात.याच हल्ल्यात मुंबई पोलिसांना मोठा धक्का बसला तो वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय साळसकर यांच्या मृत्यूचा. मेट्रो सिनेमाजवळ अतिरेक्यांशी सामना करताना त्यांना गोळ्या लागल्या. सध्या ते मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचमध्ये खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून काम करत होते. गेल्या 24 वर्षांपासून ते मुंबई पोलिसांच्या सेवेत होते. एक कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांनी अनेक गुन्हेगारांचा बंदोबस्त केला. मुंबईतल्या अंडरवर्ल्डच्या कारवायांना आळा घालण्याचे काम त्यांनी केले. मुंबई पोलिसात एन्काउंटर स्पेशॅलिस्ट म्हणून ते ओळखले जात. ते 1983 च्या आयपीएसचे बॅचचे विद्यार्थी होते. साळसकरांच्या बंदुकीने अमर नाईक, जग्गू शेट्टी, कुंदनसिंग रावत झहूर मखंडा या गॅगस्टर्सचा वेध घेतला. 97 मध्ये ते कुख्यात गुंड अरुण गवळीच्याही मागावर होते. त्यावेळी ऑपरेशनमधून गवळी निसटला होता, पण त्यावेळी झालेल्या चकमकीत सदा पावले आणि विजय तांडेल ही गवळीची महत्वाची माणसं मारली गेली. तेव्हापासून गवळीनेही त्यांचा धसका घेतला होता. गवळी आमदार म्हणून निवडून आल्यानंतरही गवळी आपल्यासाठी कुख्यात गुंडच असल्याची भूमिका त्यांनी घेतली होती आणि गवळीच्या गुन्हेगारी कारवायांवर लक्ष ठेवले होते. गेल्या 24 वर्षांपासून ते मुंबई पोलिसांच्या सेवेत होते. एक कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांनी अनेक गुन्हेगारांचा बंदोबस्त केला. मुंबईतल्या अंडरवर्ल्डच्या कारवायांना आळा घालण्याचे मुख्य काम त्यांनी केले. मुंबई पोलिसात एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून ते ओळखले जात. ते 1983 च्या आयपीएसचे बॅचचे विद्यार्थी होते. साळसकरांच्या बंदुकीने अमर नाईक, जग्गू शेट्टी, कुंदनसिंग रावत झहूर मखंडा या गॅगस्टर्सचा वेध घेतला. 97 मध्ये ते कुख्यात गुंड अरुण गवळीच्याही मागावर होते. त्यावेळी ऑपरेशनमधून गवळी निसटला होता, पण त्यावेळी झालेल्या चकमकीत सदा पावले आणि विजय तांडेल ही गवळीची महत्वाची मागणी मारली गेली. तेव्हापासून गवळीनेही त्यांचा धसका घेतला होता. गवळी आमदार म्हणून निवडून आल्यानंतरही गवळी आपल्यासाठी कुख्यात गुंडच असल्याची भूमिका त्यांनी घेतली होती आणि गवळीच्या गुन्हेगारी कारवायांवर लक्ष ठेवले होते.

close