ज्वाला-दिजू जोडीचा सलामीच्या लढतीत पराभव

July 28, 2012 11:04 AM0 commentsViews: 7

28 जुलै

भारताच्या बॅडमिंटन टीमच्या मिशन ऑलिम्पिकची सुरुवात निराशाजनक झाली आहे. ज्वाला गुट्टा आणि वी डिजू या भारताच्या मिक्स डबल्स टीमला ओपनिंग मॅचममध्येच पराभवाचा धक्का बसला आहे. ग्रुप डीच्या पहिल्याच मॅचमध्ये इंडोनेशियाच्या टी अहमद आणि नस्टीर जोडीने ज्वाला डीजू जोडीचा 21-16 आणि 21-12 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. पण या पराभवानंतरही ज्वाला डीजूचं आव्हान संपुष्टात आलं नाही. ग्रुप डीच्या त्यांच्या अजून दोन मॅच बाकी आहेत. जर या दोनही मॅच त्यांनी जिंकल्या तर ते नॉकआऊट राऊंडमध्ये प्रवेश करु शकतील. उद्या ज्वाला डीजूचा मुकाबला आहे तो जुहल आणि लेबोर्न या डॅनिश जोडीशी. ही मॅच त्यांच्यासाठी करो या मरोची ठरणार आहे.

close