महाराष्ट्राला लागली पाणीगळती, हिंगोलीत सर्वाधिक गळती

July 27, 2012 2:44 PM0 commentsViews: 7

27 जुलै

जागतिक बँकेनं महाराष्ट्र सरकारला आपला वार्षिक अहवाल सादर केला आहे. या अहवालात महाराष्ट्रात 20 ते 85 टक्के पाणीगळती होत असल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. हिंगोलीत सर्वात जास्त 85 टक्के पाणीगळती होते शिवाय राज्यात सरकरी 60 टक्के पाणी कराची वसुली केली जाते असंही या अहवालात नमूद करण्यात आलंय. राज्याच्या पाणी वितरण व्यवस्थेत अनेक त्रुटी असल्याचे या अहवालातून समोर आल्यानंतर ही गळती कमी करण्यासाठी योजना राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतली आहे. त्यााठी राज्य सरकारची 92 टक्के अनुदान देण्याची योजना आहे. या योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी नगरपालिका सक्ती करणार असं पाणीपुरवठा विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर यांनी सांगितलं.

close