अण्णांच्या आंदोलनात बाबा रामदेव सहभागी

July 27, 2012 2:56 PM0 commentsViews: 2

27 जुलै

टीम अण्णांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. आज योगगुरु बाबा रामदेव आपल्या समर्थकांसह जंतरमंतरवर दाखल झाले आहे. बाबा रामदेव यांच्या 9 ऑगस्टच्या आंदोलनात अण्णाही सहभागी होणार आहेत. दरम्यान अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदीया यांची तब्येत खालावली आहे. गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरु असूनही अजूनपर्यंत सरकारकडून आंदोलकांना कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही. टीम अण्णांच्या सदस्यांनी उपोषण सोडावं, असं आवाहन श्री श्री रविशंक यांनी केलंय.तर मीडिया या आंदोलनाला कमी महत्त्व देत असल्याचा आरोप किरण बेदींनी केला आहे. त्या पुण्यात एका कार्यक्रमासाठी आल्या असताना बोलत होत्या. आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा बेदींना दावा केला आहे.

close