भारतीय संघासोबत ती महिला कोण ?

July 28, 2012 1:11 PM0 commentsViews: 5

28 जुलै

ऑलिम्पिक संचलनात सहभागी भारतीय संघाबद्दल एक वाद उभा राहिला आहे. ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात संचलनादरम्यान भारतीय संघाबरोबर एक ओळख न पटलेली महिलासुद्धा सहभागी झाली होती. भारताचा फ्लॅग बेअरर सुशील कुमारच्या मागेच ही महिला होती. या महिलेची ओळख पटू शकली नाही. लाल रंगाचा टी शर्ट घातलेली ही महिला त्या उद्धाटन सोहळ्याची भाग नसल्याचं समजतंय. इतकचं नाही तर भारतीय संघाच्या संपूर्ण संचलनात जोपर्यंत टीम स्टेडियममध्ये आली नव्हती तोपर्यंत ती महिला टीमबरोबर नव्हती. पण टीमनं स्टेडियममध्ये प्रवेश घेतल्यावर ती महिला भारतीय संचलनात सहभागी झाली. यावरुन एकूणच खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. भारताचे सध्याचे चीफ दी मिशन यांनी आपल्याला या महिलेसंदर्भात कोणतीही माहिती नसल्याचं सांगितले आहे. विशेष म्हणजे भारतीय संघाला लाईव्ह प्रक्षेपणात फक्त दहा सेकंद दाखवले आणि यामध्ये कॅमेर्‍याचे सगळे लक्ष या महिलेवर होते. भारतीय संघात 81 ऍथलिट सहभागी आहे. पण 40 खेळाडू आणि 11 अधिकार्‍यांनी यात सहभाग घेतला.

close