जे डे हत्याप्रकरणी जिग्ना व्होराला जामीन

July 27, 2012 3:55 PM0 commentsViews: 5

27 जुलै

मिड डेचे पत्रकार जे डे हत्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पत्रकार जिग्ना व्होरा हीला जामीन मिळाला आहे. जिग्ना व्होराची प्रकृती सध्या खराब आहे आणि तिचा मुलगा लहान असल्याने कोर्टाने 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर तिची जामिनावर सुटका केली आहे. जे.डे यांच्या हत्येचा कटात सहभागी असल्याचा आरोप जिग्नावर आहे. याप्रकरणी काल विनोद तावडे यांनी जिग्नाची बाजू घेत हत्या प्रकरणात विना कारण गोवलं जातं असल्याचा आरोप केला.डे हे आयपीएल फिक्सिंग घोटाळ्याबद्दल खुलासा करणार होते त्यामुळे त्यांची हत्या झाली असं तावडे म्हणाले.

close