मुंबईतल्या विविध परीक्षा पुढे ढकलल्या

November 27, 2008 6:58 AM0 commentsViews: 5

27 नोव्हेंबर, मुंबईमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वेगवेगळ्या शाखेच्या गुरुवारच्या परीक्षा पुढं ढकलण्यात आलेत. मुंबई झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.देशाच्या इतिहासातला सगळ्यात भयंकर असा अतिरेकी हल्ला बुधवारी मुंबईत झाला. दहा ठिकाणी अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार आणि ग्रेनेड हल्ला केला असून त्यात 100 जण ठार तर 187 जखमी झाले आहेत. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला. यात प्रामुख्याने मेडिकलच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

close