पंतप्रधानांच्या घरासमोर अण्णासमर्थकांची निदर्शनं

July 28, 2012 2:09 PM0 commentsViews: 1

28 जुलै

दिल्लीत जंतरमंतरवर सुरु असलेलं टीम अण्णांचं आंदोलन पेटत चाललंय. टीम अण्णांच्या समर्थकांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सेव्हन रेड कोर्स येथील घरासमोर निदर्शनं केली आणि जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांनी लोकपाल विधेयकची मागणी करत पंतप्रधानांच्या घराकडे दगडं भिरकावली. आंदोलक एवढ्यावरच थांबले नाहीतर लोकपाल संदर्भातील पत्रक फेकली. घराच्या सुरक्षारक्षकांनी कार्यकर्त्यांना आवर घातला. मात्र कार्यकर्त्यांनी विरोध करत रस्त्यावर लोटांगण घेतले. यावेळी दिल्ली पोलिसांनी घडनास्थळी धाव घेऊन 45 आंदोलकांना अटक केली.

close